
ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग गड महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यांपैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या अगदी अखेरच्या डोंगर रांगेत असणारा किल्ला निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि भाविकांचे आवडते ठिकाण आहे. गडावर मलंगबाबाचा दर्गा असून हिंदू मुस्लिम धर्माचे भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी या ठिकाणी सेवा सुरू करण्यात येणार आहे. या पुढे पायर्या चढणे उतरण्याचा त्रास वाचेल. दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेला गडावर यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक येथे येत असतात.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ ऊन ठराविक अंतराने मलंग गडासाठी बस सेवा उपलब्ध आहे.
Leave a Reply