मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. ते जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरापेक्षा मोठे आहे.
समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर ते वसलेले आहे. हावडा, नागपूर, मुंबई या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ या शहरातून जातो.
शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय असून कापूस, ज्वारी व सोयाबीन ही पिके तेथे प्रामुख्याने घेतली जातात. सोयाबीनपासून तेल काढण्याच्या अनेक मिल येथे सुरु झाल्या आहेत.
Leave a Reply