तिन्ही बाजुंनी समुद्राने वेढलेला भूभाग आणि चौथ्या बाजुला म्हणजे उत्तरेला मुंबईशी जुळलेली शहरे, असे वाढीला प्रतिकूल परिस्थिती असलेले शहर भारतात इतर कोणतेही नाही.
सर्व शहरांची वाढ जमीनीला समांतर होत असते. मात्र मुंबईची वाढ आकाशाच्या दिशेने होत आहे.
१९५० आणि १९५७ साली मुंबईची सीमा उत्तरेच्या दिशेने वाढवण्यात आली. १९५० साली मुंबईच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढवण्यात आल्या. मूळ शहराशी ताळमेळ साधताना पायाभूत आणि आवश्यक सेवासुविधा देणे शक्य व्हावे हा यामागचा उद्देश होता.
मुंबई बंदराचा पूर्वेकडील किनारा संपूर्णपणे मानवनिर्मित आहे.
Leave a Reply