अरुणाचल प्रदेशातल्या सर्वाधिक उंचीवर वसलेल्या शहरापैकी एक शहर मेचुका. हे शहर समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंचीवर आहे. पश्चिम सियांग जिल्ह्यात ते येते. मेचुका खोर्यात प्रमुख्याने मेबा, रामो, बोकर आणि लिबो या जमातींचे वास्तव्य आहे. बौध्द, ख्रिश्चन यांच्याबरोबरच डोनी पोलो नावाच्या एका स्थानिक पंथाचे लोक राहतात.
मेचुका हे बहभाषीक शहर आहे. येथे अडी या स्थानीक भाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजीही बोलली जाते. येथील जवळपास ४०० वर्षे जुना बौध्द विहार प्रसिध्द आहे. सिवोम नावाची नदी या शहरातून वाहते. हे शहर भारत-तिबेट आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या २९ किलोमीटरवर आहे.
Leave a Reply