
मिरज हे सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वानलेस मेमोरियल हॉस्पिटल, सिध्दिविनायक कर्करोग रुग्णालय यांसह अनेक रुग्णालये या शहरात असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे उपचारासाठी येतात.
मिरज शहराने अनेक कलावंत महाराष्ट्राला दिले. हे शहर विविध प्रकारच्या तंतूवाद्यांच्या निर्मितीसाठीही प्रसिध्द आहे.
मिरज येथे मोठे रेल्वेजंक्शन आहे. एके काळी मुंबई ते बंगलोर या रेल्वेमार्गातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून मिरज जंक्शन ओळखले जाई.
Leave a Reply