मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.
मध्य युगादरम्यान ओस्मानी साम्राज्याचा व १९व्या शतकापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेला मोल्दोव्हा पहिल्या महायुद्धानंतर सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. १९९१ सालच्या सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा संयुक्त राष्ट्रे, युरोपाची परिषद, डब्ल्यू.टी.ओ., स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळालेला नाही.
१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील ट्रान्सनिस्ट्रिया प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला संयुक्त राष्ट्रसंघ वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.
राजधानी व सर्वात मोठे शहर :चिशिनाउ
अधिकृत भाषा :मोल्दोव्हन
राष्ट्रीय चलन :लेउ
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply