मोरोक्को, उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे. अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्स व स्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.
मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. २०१४ साली मोरोक्कोची लोकसंख्या सुमारे ३.३८ कोटी होती. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.
मोरोक्कोचा समुद्रकिनारा अटलांटिक महासागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरला असून जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या दोन समुद्रांना जोडते व मोरोक्कोला स्पेनपासून वेगळे करते. मोरोक्कोचा पुष्कळसा भूभाग डोंगराळ आहे व ॲटलास पर्वतरांग देशाच्या मध्यभागातून धावते. मोरोक्कोचा दक्षिणेकडील भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :रबात
अधिकृत भाषा :अरबी, बर्बर, फ्रेंच
राष्ट्रीय चलन :मोरोक्कन दिरहाम (MAD)
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply