मुन्नार हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवर वसलेले असून, देशातील एक नावाजलेले हिलस्टेशन आहे. पश्चिम घाटातील हिरव्यागार टेकड्यांमध्ये ते वसलेले असून, मुन्नारचा अर्थ तीन नद्यांचा संगम असा होतो. मुन्नारजवळच्या मधुरपुझा, नलथन्नी आणि कुंडली या त्या तीन नद्या होत.
नावाजलेले हिलस्टेशन
मुन्नार शहर केरळमधील प्रसिद्ध कानन, देवन पर्वतरांगांवर वसलेले असून, एर्नाकुलमपासून ते १४० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. प्रसिद्ध मतुपेट्टी धरण या |शहरापासून जवळ आहे. येथे अनेक चहाचे मळे आहेत.
Leave a Reply