नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्या क्रमांकाचे हिरवे शहर असा नागपूरचा लौकिक आहे. या जिल्ह्यातील नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. नागपूरची संत्री जगभरात प्रसिध्द आहेत. नागपूरला संत्र्यांचे शहर किंवा नारिंगी शहर (ऑरेंज सिटी) म्हटले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय ही नागपूरची अन्य काही ठळक वैशिष्ट्ये.