नामक्कल’ हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. या शहराला नामगिरी असेही म्हणतात. महापालिकेमार्फत या शहराचा कारभार चालतो. कोगुनाडू किंवा कोंगु देसम या विभागात हे शहर येते. या शहरातील नामक्कल किल्ला प्रेक्षणीय असून, त्याची उभारणी रामचंद्रराव नायक यांनी केली. येथील अंजनेयार मंदिरही प्रसिद्ध आहे.
पर्यावरणासाठी आयएसओ प्रमाणपत्र
पर्यावरणासाठीचे आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारी ‘नामक्कल’ ही देशातील पहिली महापालिका आहे. स्वच्छ पाणीपुरवठा, घन कचऱ्याचे व्यवस्थापन त्याचबरोबर उत्कृष्ट नगररचना यासाठी या महापालिकेला आयएसओ प्रमाणापत्र मिळालेले आहे.
Leave a Reply