महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला.
भौगोलिकदृष्ट्या हे शहर खानदेशात येते. येथील दंडपानेश्वर मंदिर प्रसिध्द आहे. नंदराज या राजाने या भागावर राज्य केले, यावरुन याला नंदनगरी असेही म्हणतात.
१९४२ साली या शहरात शिरीषकुमार हे क्रांतिकारी इंग्रजांच्या गोळीबारात शहीद झाले. त्यांच्या गौरवार्थ येथे यथोचित स्मारक उभारले गेले आहे.
Leave a Reply