नंघाल हे आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील एक मोठे शहर आणि एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या शहराचे पूर्वीचे नाव नंदलुरु असे होते. भगवान शिवाचे वाहन नंदी याच्या नावावरून हे नाव पडलेले आहे. चारी बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या या शहराभोवती नंदीची नऊ मंदिरे असून, त्यांना नवनंदी असे म्हणतात. शहरालगतच्या उमामहेश्वर मंदिरासमोर जगातील सर्वांत उंच नंदीची मूर्ती आहे.
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
नंद्याल हे आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नवनंदी दर्शनासाठी जाणारे हजारो भाविक येथे भेट देतात. सुप्रसिद्ध गुंडला ब्रम्हेश्वरम अभयारण्य येथून ३० किलोमीटरवर असून, येथे माउस डीअर नावाची दुर्मीळ हरणे आढळतात.
Leave a Reply