नेल्लूर हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथील सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी श्री पोट्टी श्री रामलू यांच्या स्मरणार्थ ‘श्री पोट्टी श्री रामलू नेल्लूर ‘ नावाच्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली; पण शहराचे नेल्लूर नाव मात्र कायम ठेवण्यात आलेले आहे. आंध्र प्रदेशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये नेल्लूरचा सहावा क्रमांक लागतो.
नेल्लूरचे लिंबू प्रसिद्ध
नेल्लूर हे शहर चेन्नई-कोलकाता महामार्गावर वसलेले असून, चेन्नईपासून त्याचे अंतर १६८ किलोमीटर आहे. पेत्रेरु नदीकिनाऱ्यावरील या शहरात लिंबांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथे घडविले जाणारे सोन्याचे दागिनेही देशभर प्रसिद्ध आहेत.
Leave a Reply