न्यू झीलंड हा ओशनिया खंडामधील एक द्वीप देश आहे. प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या १,५०० किमी पूर्वेस उत्तर बेट व दक्षिण बेट ह्या दोन प्रमुख बेटांवर वसलेला न्यू झीलंड त्याच्या अति दुर्गम स्थानामुळे जगातील सर्वात उशिरा शोध लागलेल्या ठिकाणांपैकी एक होता.
माओरी जमातीचे लोक येथे इ.स. १२५० – १३०० दरम्यान दाखल झाले व त्यांनी येथील माओरी संस्कृतीची स्थापना केली. इ.स. १६४२ साली आबेल टास्मान हा डच शोधक व खलाशी येथे पोचला. त्यानंतर १७६९ सालच्या जेम्स कूकच्या येथील सफरीनंतर येथे युरोपीय व्यापारी मोठ्या प्रमाणावर भेट देऊ लागले. इ.स. १८४० मध्ये ग्रेट ब्रिटनने माओरी लोकांसोबत करार करून न्यू झीलंडला ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलिन केले. इ.स. १९०७ मध्ये राजा सातव्या एडवर्डने न्यू झीलंडला साम्राज्यामध्ये एका स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला व १९४७ साली न्यू झीलँडला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले. सध्या ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी ही न्यू झीलंडची संविधानिक राष्ट्रप्रमुख असून जॉन की हे पंतप्रधान आहेत. वेलिंग्टन ही न्युझीलंड ची राजधानी तर आॅकलँड हे सर्वात मोठे शहर आहे.
न्यू झीलंड हा जगातील एक प्रगत व समृद्ध देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात पाचव्या स्थानावर आहे. न्युझीलंड मध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :वेलिंग्टन, ऑकलंड
अधिकृत भाषा :इंग्लिश, माओरी
राष्ट्रीय चलन :न्यू झीलंड डॉलर
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply