ओमानची सुलतानी (अरबी: سلطنة عمان) हा मध्यपूर्वेतील अरबी द्वीपकल्पाच्या आग्नेय टोकावर वसलेला एक देश आहे. ओमानच्या वायव्येला संयुक्त अरब अमिराती, पश्चिमेला सौदी अरेबिया व नैऋत्येला येमेन हे देश तर पूर्वेला व दक्षिणेला अरबी समुद्र आणि उत्तरेला ओमानचे आखात आहेत. मस्कत ही ओमानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
ओमानमध्ये १९९४ पर्यंत इबादी इमामांचे शासन होते. त्यानंतर राज्यसत्ता अस्तित्वात आली. १५०७ ते १६५० या कळात येथील किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी तबा मिळवला. त्यांची हकालपट्टी करुन १८ व्या शतकात अल बु सईद घराणे सत्तेवर आले. १९६४ साली येथे खनिज तेलाचा शोध लागला. १९७० साली सुलतानास पदच्युत करुन त्याचा मुलगा रातेन सत्तेवर आला. त्याने आधुनिकीकरणाला प्राधान्य दिले. १९९० च्या दशकात ओमानने परराष्ट्र संबसध वाढवण्यास सुरुवात केली.
राजधानी व सर्वात मोठे शहर :मस्कत
अधिकृत भाषा :अरबी
राष्ट्रीय चलन :ओमानी रियाल
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply