ओंगोल हे शहर आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, येथे जिल्हा मुख्यालय आहे. आंध्र प्रदेशातील, एक महत्त्वाचे नेते ‘आंध्रकेसरी’ तंगुतुरी प्रकाशम पांथलू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पूर्वीच्या ओंगोल जिल्ह्याचे नाव ‘प्रकाराम’ असे ठेवण्यात आले असले तरी ओंगोल शहराचे नाव बदललेले नाही. हे शहर या परिसरातील विशिष्ट प्रकारच्या ओंगोल बैलांसाठी प्रसिद्ध आहे.
तंबाखूची बाजारपेठ
ओंगोल या शहरातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून, हे शहर आंध्र प्रदेशातील तंबाखूची मोठी बाजारपेठ आहे. हावडा-चेन्नई रेल्वेमार्गावरील ओंगोल हे महत्त्वाचे स्थानक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ या शहरातून जातो.
Leave a Reply