पैनावू हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर आहे. हे थोड्डुपुझा तालुक्यात येते. २६ जानेवारी १९७२ रोजी इडुक्की जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर काही दिवस जिल्ह्याचे मुख्यालय कोट्टायम येथे होते; परंतु १९७६मध्ये ते पैनावू येथे हलविण्यात आल्यानंतर तेथे सुनियोजित वसाहत तयार करण्यात आली. राज्य महामार्ग क्र. ३३ या शहराजवळून जातो.
निसर्गसंपन्न शहर
पैनावू हे हिरवाईने नटलेले निसर्गसंपन्न शहर असून, केरळमधील सुप्रसिद्ध इडुक्की आणि चेरुथोनी हे धरण प्रकल्प येथून खूपच जवळ आहेत. राज्य शासनाची अनेक कार्यालये या शहरात आहेत. ऑक्टोबर ते जानेवारी हा कालावधी येथील पर्यटनासाठी योग्य ठरतो.
Leave a Reply