पाकिस्तान

पाकिस्तान हा दक्षिण आशियात असलेल्या भारताच्या वायव्य सीमेवरील देश आहे. पाकिस्तान हे के॓द्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार के॓द्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची ही सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १७ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमा॓क आहे. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, औद्योगिकरण हे उर्जितावस्तेत आहेत. पाकिस्तानी अर्थव्यवस्था जगात २७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून, लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले वादग्रस्त संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही दहशतवाद, दारिद्र्य, निरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.

पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक अण्वस्त्रसज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेलेल हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे नाटोबाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि चीनसोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल आणि जी-२० संघटनांचे सदस्य आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :इस्लामाबाद, कराची
अधिकृत भाषा :उर्दू, इंग्लिश
राष्ट्रीय चलन :पाकिस्तानी रुपया (PKR)

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*