पळणी हे तमिळनाडू राज्यातल्या दिंडीगूल जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मदुराईपासून १०० किलोमीटरवर तर दिंडीगूलपासून ६० किलोमीटरवर वसलेले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ७०४६७ इतकी आहे. कोईम्बतूर आणि बंगलोर या शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २०९ या शहरातून जातो.
मुरुगन मंदिर प्रसिद्ध
पळणी शहरातील मरुगन मंदिर देशात प्रसिद्ध आहे. येथील शिवगिरी हिल किंवा पळणी हिलच्या माथ्यावर हे मंदिर आहे. या प्राचीन मंदिराच्या खांबांवर तसेच कळसावर सुंदर कोरीव काम पहायला मिळते. लाखो भाविक या मंदिराला प्रतिवर्षी भेट देतात.
Leave a Reply