पालीन हे अरुणाचल प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आणि एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे.
कुरुंगकुमे या जिल्ह्यात हे शहर येते. समुद्रसपाटीपासून १०८० मीटर उंचीवर वसलेल्या या शहराची लोकसंख्या ५८१६ इतकी आहे.
वर्षभर येथील हवामान १५ ते २० अंश सेल्सिअस असे अल्हाददायक असते. उन्हाळ्यात ४ ते ५ अंशाचा फरक पडतो.
पालीन शहरात वर्षभर ढगाळ हवामान असते. पाऊसही कमी अधिक फरकाने वर्षभर पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांत येथे वासळांचाही धोका असतो.
पालीन शहर आणि परिसरात निशीन जमातीचे लोक प्रामुख्याने राहतात. येथील होली रोझरी चर्च प्रसिध्द असून, पालीन नावाची नदी या शहरातून वाहते.
Leave a Reply