पेराग्वेचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República del Paraguay, ग्वारानी भाषा:Tetã Paraguái) हा दक्षिण अमेरिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. पेराग्वेच्या उत्तरेस बोलिव्हिया, पूर्वेस ब्राझिल आणि दक्षिणेस आर्जेन्टिना हे देश आहेत. पेराग्वे नदी या देशातून उत्तर-दक्षिण वाहते.
सोळाव्या शतकापासून स्पेनची वसाहत असलेल्या पेराग्वेला १८११ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील अनेक दशके येथे लष्करी हुकुमशहांनी सत्ता गाजवली. त्यांच्या अविचारी व स्वार्थी धोरणांमुळे येथील प्रगती खुंटली व अनेक अनावश्यक युद्धांत येथील ६० ते ७० टक्के जनता मृत्यूमुखी पडली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पेराग्वेवर आल्फ्रेदो स्त्रॉसनर ह्याची प्रदीर्घ काळ सत्ता होती. १९८९ साली त्याची लष्करी हुकुमशाही उलथवून टाकण्यात आल्यानंतर पेराग्वेमध्ये १९९३ सालापासून लोकशाही मार्गाने निवडणुका घेतल्या जात आहेत. सध्या पेराग्वे हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक मानला जातो. परंतु २०१० साली पेराग्वेची अर्थव्यवस्था १४.५ टक्के इतक्या दराने वाढली.
राजधानी व सर्वात मोठे शहर :आसुन्सियोन
अधिकृत भाषा :स्पॅनिश, ग्वारानी
राष्ट्रीय चलन :गुआरानी
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply