पुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.
पर्वती टेकडी आणि त्यावरील मंदिरे तसेच पेशव्यांचे वस्तुसंग्रहालय ही पुणे शहरातील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.
मराठा साम्राज्याचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे यांनी पर्वती टेकडीवर श्री देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले. २३ एप्रिल १७४९ रोजी या मंदिराची स्थापना करण्यात आली.
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपर्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय),गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत.
पानिपताच्या तिसर्या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे जून १७६१ मध्ये येथील होमशाळेत झाले.
Leave a Reply