पत्तनम्तिट्टा हे शहर केरळमधील जिल्हा मुख्यालय असलेले शहर असून, त्याचा मध्य त्रावणकोर विभागात समावेश होतो.
हिंदू धर्मीयांचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ शबरीमला या शहरापासून जवळ आहे.
आचनकोवील नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहराचे नाव पट्टणम आणि थिटा या दोन मल्ल्याळम् शब्दांवरून पडलेले आहे. याचा अर्थ नदीकाठचे शहर असा होतो.
निसर्गसंपन्न शहर
पत्तनम्तिट्टा हे शहर समुद्रसपाटीपासून १८ मीटर उंचीवर वसलेले आहे. केरळमधील हे एक निसर्गसंपन्न शहर असून, शबरीमला येथे जाणारा पुनलूर ते मुबट्टपुझा हा मुख्य रस्ता या शहरातून जातो. त्यामुळे येथून शबरीमलासाठी अनेक बसेस सुटतात.
Leave a Reply