पोल्लाची हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कोईम्बतूर (ग्रामीण) जिल्ह्यातील एका तालुक्याचे मुख्यालय या शहरात असून, त्या जिल्ह्यातील ते दुसरे मोठे शहर आहे. या शहरातील हवामान वर्षभर आल्हाददायक असल्याने ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ९०,१८० इतकी आहे.
आशियातील सर्वांत मोठे गूळ मार्केट
पोल्लाची शहरातील गूळ मार्केट आशिया खंडातील सर्वांत मोठे मार्केट म्हणून ओळखले जाते. पोल्लाचीच्या गुळाला देशभर मोठी मागणी आहे. तसेच भाजीपाल्याचेही मोठे मार्केट या शहरात आहे. येथील भाजीपाला केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पाठविला जातो.
Leave a Reply