
पुट्टपर्थी हे आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सत्यसाईबाबांचा ‘प्रशांती निलयम’ नावाचा आश्रम या शहरात आहे. हेच या शहराचे मुख्य वैशिष्ट आहे. या शहरातील विविध हॉटेल्स, लॉजेस, रेस्टॉरंट यांची सर्व अर्थव्यवस्था या आश्रमाला भेट देणाऱ्या भक्तगणांवर अवलंबून आहे.
बहुभाषिक शहर
पुट्टपर्थी शहरात देशपरदेशांतून येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे येथे तमिळ, तेलगू, कानडी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा बोलल्या जातात. रोड, रेल्वे व हवाई सेवेने हे शहर देशाशी जोडलेले आहे.
Leave a Reply