महाराष्ट्रात सुमारे ५४६१ किमी लांबीचे रेल्वे मार्ग आहेत.
मुंबई, नागपूर, मनमाड, अकोला, पुणे, आणि सोलापूर ही प्रमुख रेल्वे जंक्शन्स आहेत. नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्याने पूर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण या चारही दिशाना जाणार्या गाड्या तेथून जातात.
पश्चिम किनारपट्टीस समांतर रेल्वे असावी या उद्देशाने बांधण्यात आलेला कोकण रेल्वेचा मार्ग हे भारतीय रेल्वेचे एक वैशिष्ट्य आहे. अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत हा मार्ग तयार केला गेला आहे.
मुंबईहून देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. मुंबईत उपनगरीय रेल्वेचे प्रचंड मोठे जाळे आहे.
Leave a Reply