मुंबईतील राजाबाई टॉवर २६० फूट उंच आहे. लंडनच्या बिगच्या धर्तीवर हा टॉवर मुंबईत बांधण्यात आला.
या टॉवरचे डिझाईन इंग्रजी वास्तुकार सर गिलबर्ट स्कॉट यांनी तयार केले. नोव्हेंबर १८७८ मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर प्रथमच २०१४ मध्ये या टॉवरच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. सध्या हा टॉवर मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत आहे.
मुंबईतील जुने ख्यातनाम उद्योजक प्रेमचंद रॉयचंद यांनी शहरात सर्वात उंच टॉवर बाधण्यासाठी १८६९ मध्ये दोन लाख रुपयांची देणगी दिली होती. या टॉवरला त्यांच्या आईचे नाव दिले जावे अशी त्यांची अट होती. त्यामुळे या टॉवरला त्यांच्या आईचे म्हणजेच राजाबाई टॉवर हे नाव दिले गेले.
राजाबाई या अंध होत्या. त्यांना संध्याकाळ झाल्याचे समजावे म्हभणून या टॉवरवरील घड्याळाला इव्हिनिंग बेल दिली आहे.
Leave a Reply