अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. या गावाने पर्यावरणाचा समतोल राखून जलसंधारणाची कामे करुन एक आदर्श निर्माण केला. दारुसाठी प्रसिध्द असलेल्या या गावाचा प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्ररणेने कायापालट झाला आहे.
लष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात हजारेंनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्न करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली.
आज राळेगण सिध्दी हे पर्यटनस्थळच बनले आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक भेटी देतात.
Leave a Reply