वनवासात असताना प्रभू रामाचंद्राचे रामटेक परिसरात वास्तव्य होते. त्यामुळे या ठिकाणाचे नाव रामटेक ठेवले गेले. या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे ६०० वर्षे पुरातन ऐतिहासी मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांचा खास शास्त्रसाठा या मंदिरात असून, इ. स. २५० मध्ये रामटेकचा परिसर मौर्य शासकांच्या अधिपत्याखाली होता. प्रचीन स्थळ म्हणून रामटेकला विषेश महत्व आहे.
वनवासाच्या काळात श्रीरामांनी या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली होती असे म्हटले आहे. रामटेकच्या जवळच महान अगस्त्य ऋषींचे आश्रम होते, अशीही आख्यायिका आहे. या आश्रमात ऋषी तप करायचे आणि राक्षस त्यांची तपश्चर्या उद्ध्वस्त करायचे. भगवान श्रीरामांनी संपूर्ण सृष्टी राक्षसांपासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा येथे घेतली. स्थानिक भाषेत टेकचा अर्थ प्रतिज्ञा असा होत असल्यामुळे या जागेला रामटेक असे नाव पडले. असेही म्हटले जाते की रामटेक येथे जो कुणी प्रतिज्ञा घेत असतो त्याची प्रतिज्ञा पूर्ण होत असते.
देवगड किल्ला सर केल्यानंतर नागपूरचे राजे रघुजी भोसले यांनी या मंदिराची स्थापना केली असल्याचे म्हटले जाते.
महान कवी कालिदास यांच्या वास्तव्यामुळेही या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. रामटेकच्या टेकडीवर बसूनच कालिदासांनी ‘मेघदूतम’ लिहिले आहे.
दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढविली होती.
Leave a Reply