निर्मळ, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे व हापूस आंबे, काजू, नारळी, पोफळीच्या बागा यांनी संपन्न असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी. या जिल्हयाला निसर्गाने जणू काही अप्रतिम सौंदर्यच बहाल केले आहे. म्हणून हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा आहे.
जगप्रसिद्ध हापूस आंब्याचे माहेरघर म्हणजे रत्नागिरी. याचबरोबर कोकम सरबत, आंबा पोळी, नाचणीचे पीठ आदी खास कोकणी उत्पादनांना महाराष्ट्रातून मोठी मागणी असते.
रत्नागिरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमी. रत्नागिरीचा उल्लेख देवभूमी असाही केला जातो. थिबा पॅलेस हे रत्नागिरीतले सर्वात मोठे आकर्षण आहे.