रोमेनिया (मराठी-हिंदीत रुमानिया) हा पूर्व युरोपामधील एक देश आहे. रुमानियाच्या पश्चिमेला सर्बिया व हंगेरी, उत्तरेला युक्रेन, पूर्वेला मोल्दोव्हा, दक्षिणेला बल्गेरिया हे देश तर आग्नेयेला काळा समुद्र आहे. बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
मध्य युगात रुमानियाच्या राजतंत्राचा भाग असलेल्या रोमेनियाला १८७७ साली ओस्मानी साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया, बेसारेबिया व बुकोव्हिना प्रदेशांसोबत मोठ्या राष्ट्राची स्थापना केली. दुसर्या महायुद्धामध्ये १९४१ ते १९४४ दरम्यान अक्ष राष्ट्रांच्या बाजूने लढणार्या रुमानियाने १९४४ नंतर बाजू बदलून दोस्त राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली. युद्ध संपल्यानंतर सोव्हियेत संघाच्या हुकुमावरून वॉर्सो करारामध्ये सहभाग घेतला व कम्युनिस्ट राजवट स्थापन केली. इ.स. १९८९ साली येथे झालेल्या क्रांतीदरम्यान निकोलाइ चाउसेस्कुची कम्युनिस्ट सत्ता उलथवून टाकण्यात आली व रुमानियाची लोकशाहीकडे वाटचाल सुरू झाली. सध्या रुमानिया हा एक विकसित देश मानला जातो.
२९ मार्च २००४ साली रुमानियाला नाटोमध्ये तर १ जानेवारी २००७ रोजी युरोपियन संघात प्रवेश देण्यात आला.
राजधानी व सर्वात मोठे शहर :बुखारेस्ट
अधिकृत भाषा :रोमेनियन
राष्ट्रीय चलन :रोमेनियन लेउ
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply