सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स (Saint Vincent and the Grenadines) हा कॅरिबियनमधील एक छोटा द्वीप-देश आहे. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स कॅरिबियन समुद्रातील अँटिल्स द्वीपसमूहाचा भाग असून त्याच्या उत्तरेला सेंट लुसिया, पूर्वेला बार्बाडोस तर दक्षिणेला ग्रेनेडा हे देश आहेत. ह्या देशाच्या अखत्यारीमध्ये सेंट व्हिन्सेंट हे मध्यम आकाराचे बेट व ग्रेनेडीन्स ह्या द्वीपसमूहामधील अनेक लहान बेटे आहेत.
इ.स. १७१९ मध्ये हा प्रदेश फ्रेंच वसाहती साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. इ.स. १७६३ साली फ्रेंचांनी सेंट व्हिन्सेंटचा ताबा ब्रिटिशांकडे दिला. त्यापुढील २०० वर्षे ब्रिटिश साम्रज्याचा भाग राहिल्यानंतर १९७९ साली सेंट व्हिन्सेंटला स्वातंत्र्य मिळाले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असणाऱ्या सेंट व्हिन्सेंटमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही प्रकारचे सरकार आहे. युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी ही सेंट व्हिन्सेंटची राष्ट्रप्रमुख असून राल्फ गोन्साल्वेस हा विद्यमान पंतप्रधान आहे.
केळ्याची लागवड व पर्यटन हे प्रमुख उद्योग असणाऱ्या सेंट व्हिन्सेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. सतत येणाऱ्या वादळांमुळे येथील अर्थव्यवस्थेला सर्रास धक्का बसतो.
राजधानी व सर्वात मोठे शहर :किंग्सटाउन
अधिकृत भाषा :इंग्लिश
राष्ट्रीय चलन :पूर्व कॅरिबियन डॉलर
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply