सेलम

सेलम हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कोईम्बतूरपासून अवघ्या १६० किलोमीटरवर ते वसलेले असून, तमिळनाडू राज्यातील पाचवे मोठे शहर आहे. १०० वर्गकिलोमीटरवर विस्तारलेल्या या शहराचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालतो. १८६७ साली स्थापन झालेल्या नगरपालिकेचे १९९४ मध्ये महानगरपालिकेत रुपांतर झाले.

वर्षभर उष्ण व कोरडे हवामान
सेलम शहरात वर्षभर उष्ण व कोरडे हवामान असते. या शहरातील पर्जन्यमानही तमिळनाडू राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अगदी कमी असते. सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे शहर समुद्रसपाटीपासून २७८ मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*