सामो‌आ

सामोआचे स्वतंत्र राज्य हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. सामोअन द्वीपसमूहाच्या पश्चिम भागमध्ये वसलेल्या सामोआची लोकवस्ती प्रामुख्याने उपोलू व सवई ह्या दोन बेटांवर स्थित आहे. आपिया ही सामोआची राजधानी व प्रमुख शहर आहे.

इ.स. १७२२ साली सामोआ बेटांवर पोचलेला याकोब रोग्गेव्हीन हा पहिला युरोपीय शोधक होता. ह्या बेटांच्या अधिपत्यासाठी १९व्या शतकामध्ये जर्मनी, युनायटेड किंग्डम व अमेरिका ह्यांच्यामध्ये अनेक युद्धे झाली. अखेर इ.स. १९०० साली ह्यांमध्ये तह होऊन सामोआ बेटांचा पूर्व भाग अमेरिकन सामोआ ह्या नावाने अमेरिकेच्या अधिपत्याखाली आला तर पश्चिम सामोआवर जर्मन साम्राज्याची सत्ता आली. पुढील १४ वर्षे हा भूभाग जर्मन सामोआ ह्या नावाने ओळखला जात असे. इ.स. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुरूवातीच्या काळात ब्रिटनच्या विनंतीनुसार न्यू झीलंडने साओआवर आक्रमण केले. १९६२ सालापर्यंत न्यूझीलंडच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर सामोआला १ जानेवारी १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. १५ डिसेंबर १९७६ रोजी सामोआला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रवेश मिळाला.

राजधानी व सर्वात मोठे शहर :आपिया
अधिकृत भाषा :सामोअन, इंग्लिश
राष्ट्रीय चलन :सामोअन टाला

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*