सान मारिनो हा युरोपातील एक छोटा देश आहे. सान मारिनो देश पुर्णपणे इटली देशाच्या अंतर्गत आहे. सान मारिनो हा युरोपातील तिसरा सर्वात लहान देश आहे.
चौथ्या शतकात सेंट मॉरिनद्वारे सॅन मारिनो या देशाची स्थापना करण्यात आली. बाराव्या शतकादरम्यान याचा कम्युनमध्ये विकास झाला. शेजारील देशांच्या आव्हानाला तोंड देत सॅन मारिनोने आपले स्वातंत्र्य टिकविले. १८६१ मध्ये इटलीच्या एकीकरणानंतर सॅन मारिनोचे पुनरुज्जीवन करण्यात येऊन येथे प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. सॅन मारिनो हा जगातील सर्वांत जुना गणतंत्र असलेला देश आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :सान मारिनो शहर, दोगाना
अधिकृत भाषा :इटालियन
राष्ट्रीय चलन :युरो
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply