संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक. मुंबईच्या बोरिवली या उपनगरात १०४ चौ.किमी. परिसरात पसरलेले हे जंगल नॅशनल पार्क या नावानेही ते प्रसिद्ध आहे. हा भाग पूर्वी कृष्णगिरि उपवन म्हणून ओळखला जात असे. या राष्ट्रीय उद्यानाच्या दुसर्या बाजूला ठाणे शहराचा उपवन आणि येऊर हा भाग आहे.
या जंगलात वन्य प्राण्यांचा संचार असल्याने काही भागात पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. येथे वाघ, सिंह, चित्ता, सांबर, माकड, सर्प यांसारखे वन्य प्राणी अजूनही आढळतात. येथे व्याघ्र प्रकल्प राबवला जात असून वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलसफारीची सोयसुद्धा उपलब्ध आहे.
या राष्ट्रीय उद्यानात निरनिराळ्य़ा प्रकारचे वृक्ष, किटक, पक्षी यांच्या प्रजाती सुध्दा बघायला मिळतात. येथे नौकाविहाराची सोय उपलब्ध आहे, तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सुरु करण्यात आलेली वनराणी ही मिनी ट्रेन लहानांबरोबरच मोठ्यांच्याही आवडीची झाली आहे. राष्ट्रपिता महात्मागांधीच्या स्मरणार्थ येथे गांधी टोपीची प्रतीकृतीही उभारण्यात आली आहे.
Leave a Reply