
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे एका स्तंभावर गणेशपट्ट आहे. येथील भट यांच्या घरासमोरील ओसरीमध्ये असलेल्या ९० से. मी स्तंभावर चारही बाजूस वेगवेगळ्या गणेश प्रतिमा आहेत. यापैकी सर्वतोभद्र हा एक गणेश आहे. अतिशय पुरातन मूर्तीमुळे या गणेशाला अनोखे महत्त्व आहे.