असाम राज्यातील कॅचर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर सीलचर. लोकसंख्या आणि आकारमान या दोन्ही दृष्टीने हे शहर आसाम राज्यातील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर गुवाहाटीपासून ३४३ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. बरॅक नदीच्या किनार्यावर हे शहर वसलेले असून बरॅकचे खोरे संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे.
सीलचरमध्ये ९० टक्के लोक हे बंगाली असून ते बंगाली भाषेसारखी असलेली सील्हेटी नावाची बोली बोलतात. त्याचबरोबर येथे बिष्णुपुरी, मणीपुरी, मारवाडी व असामी या भाषाही बोलल्या जातात. ब्रिटिश काळात बरॅक नदीच्या किनार्यावर मोठी जहाजे येत असत. त्यामुळेच येथे मोठी बाजारपेठ आहे.
Leave a Reply