शिमोगा हे मध्य कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर असून ते तुंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शहराला मलनाड प्रांताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात.
हे शहर समुद्र सपाटीपासून ५६९ मीटर उंचीवर वसलेले आहे. शिवा आणि मोगा या दोन कन्नड शब्दांपसून शिमोगा हे नाव पडलेले असून, मोगाचा अर्थ चेहरा असा होतो. म्हणूनच शिवाचा चेहरा म्हणजे शिमोगा होय.
शिमोगा शहर परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यामध्ये शिवप्पा नायक यांचा राजवाडा, सागर तालुक्यातील प्रसिध्द जोग फॅाल्स, पश्चिम घाटातील एक हिलस्टेशन कोडचड्री, तुंगा आणि भद्रा नद्यांचा संगम असलेले कुडली यांचा समावेश आहे. बंगलोरहून बस आणि रेल्वेने येथे जाता येते.
Leave a Reply