
पुणे-नासिक महामार्गावर चाकण -राजगुरूनगर- मंचर- नारायणगांवाहून जुन्नर मार्गे लेण्याद्री हे अंतर पुण्यापासून ९४ किमी. आहे.
श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाला जाण्यासाठी ३०२ पायऱ्या चढून जाव्या लागतात.
खडकांत कोरलेले लेणी स्वरूप हे मंदिर दक्षिणाभिमुख असून दगडातच कोरलेली मूर्ती उत्तराभिमुख आहे. सुमारे ५०7६० फूट लांबी रूंदीचा सभा मंडप अखंड खडकात कोरलेला असून मध्ये एकही खांब नाही हे या सभामंडपाचे वैशिष्ट आहे.
इतक्या उंचीवरही मंदिराबाहेर एक थंडगार मधूर पाण्याची विहीर आहे.
Leave a Reply