सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले.
हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याचीही आख्यायिका आहे. पूर्वी याठिकाणी कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या महागणपतीस विवाहविनायक असेही म्हटले जाते.
टिटवाळा हे मुंबई-नासिक लोहमार्गावर कल्याणपासून तिसरे स्टेशन आहे. टिटवाळा स्टेशनपासून ३ किलोमीटर अंतरावर तलावाच्या काठावर प्रशस्त परिसरात हे मंदिर आहे. स्टेशनपासून वाहतुकीच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत.
श्रीची मूर्ती भव्य प्रसन्नमुखी असून तीन ते साडेतीन फूट उंच व तितकीच रूंद आहे. मोहक रूप व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी ती नेहमी तयार असते.
Leave a Reply