अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर.
मोरगाव हे कऱ्हा नदीच्या काठी वसले असून पुण्याहून साधारणत: दीड तासात मोरगावला जाता येते. पुणे – हडपसर – सासवड – जेजूरी- मोरगाव हा ६४ कि. मी. अंतराचा रस्ता आहे. पुणे सोलापूर रोडवरील चौफुला पासून मोरगांवला दुसरा मार्ग आहे.
मंदिर उत्तराभिमुख आहे. येथील मंदिराचे बांधकाम दगडी आहे. सभामंडपासमोर देवाचा गाभारा आहे. यामध्ये श्रींची डाव्या सोंडेची मनमोहक पूर्वाभिमुख स्वयंभू मखरात बसविलेली आहे. मस्तकावर नागफणा आहे. मुर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत देदीप्यमान हिरे बसविलेले आहेत. गणपतीच्या आजूबाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत. सभा मंडपात आठ दिशांना अष्टगणपती आहेत. या गणपती समोर मोठा उंदिर आहेच, पण मोठा नंदीही आहे.
आज घराघरात म्हटली जाणारी `सुखकर्ता दु:खहर्ता….` ही गणपतीची आरती समर्थ रामदासांना याच मोरेश्वरासमोर स्फुरली असे म्हणतात.
डोळय़ात आणि बेंबीत हिरे, सभोवताली पितळी मखर, मस्तकावर फणा पसरलेला नाग असा मोरेश्वराचा थाट असतो. या ठिकाणचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गणेशाच्या मूर्तीसमोर चक्क नंदीची स्थापना करण्यात आली आहे.
Leave a Reply