रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे.
गणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या पेटीत ठेवलेली मूळ गणेश मूर्ती आहे. ही मूळ मूर्ती म्हणजेच ‘लक्ष्मी गणेश’ आहे. ती पिवळ्या संगमरवराची असून तिच्याही बाजूस ऋद्धि सिद्धी व लक्ष लाभ (पुत्र) असून ती कोरिव व अती लहान आहे. ही मूर्ती सन १७०० च्या सुमारास परशुरामांनी लंबोदरानंद स्वामीना ध्यानधारणेसाठी दिली अशी कथा आहे. परशुरामांच्या सांगण्यानुसार तिची पुजा केली जात नाही. पूजेची मोठी मूर्ती बडोद्याचे सावकार मैराळ यांच्याकडून आणली आहे. येथील उंदीर सुद्धा एक लहान स्वतंत्र मंदिरात आहे.
या मंदिराशेजारी लंबोदर स्वामींची समाधी आहे.
कनकेश्वराला मुंबईहून रेवसपर्यंत सागरमार्गे जाता येते; रेवस ते कनकेश्वर अशी एस . टी . आहे. अलिबाग धरमतर एस. टी. नेही कनकेश्वरला जाता येते.
कनकेश्वर मंदिराची माहिती देणारा हा एक व्हिडिओ बघा…
Leave a Reply