सारस बागेतील सिद्धीविनायक, पुणे

Siddhivinayak at Sarasbaug in Pune

पुण्याच्या पेशवे पार्क जवळील सारस बागेमध्ये सिद्धीविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर आहे. यालाच तळ्यातील गणपती म्हणतात.

हैदर अलीवर स्वारीसाठी निघण्याआधी माधवराव पेशवे यांनी हे तळे नीट डागडूजी करून त्यात थेऊरच्या गणपतीची प्रतिकृती स्थापन केली.

पुढे कुमठेकर नावांच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सध्या असलेली संगमरवरी मूर्ती बसवली व कॉर्पोेरेशनने या तळ्याला चांगले रूप देऊन सुंदरशी बाग निर्माण केली.

या गणेशाला लागोपाठ २१ दिवस नवस बोलला तर तात्काळ पूर्ण होतो. अशा येथील भक्तांचा स्वानुभव आहे. यासाठी २१ दिवस नियम पाळणे जसे दुर्वा वाहणे, लाल फुल वाहणे इ.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*