विनायक गावाजवळचा सिद्धी विनायक

गांव विनायक, उरण ता. पनवेल जि. रायगड. मुंबई ते उरण ९६ किमी

उरण गावाच्या पश्चिमेस १.६ किमी. अंतरावर विनायक नावाचे गांव आहे. तिथे सिद्धी विनायकाचे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे प्राचीन गणेश मंदिर आहे.

गणेश मूर्तीच्या मागील बाजूस वीस ते पंचवीस ओळींचा संस्कृत शिलालेख असून त्यावरून हे मंदिर हबीरराजाच्या काळाचे असावे असे समजते.

हे गणेश स्थान अत्यंत जागृत असून हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या गणपतीच्या नावावरूनच या गावाला विनायक हे नांव पडले आहे. येथील मूर्ती चार फुट उंच असून पाषाणात कोरली आहे. मंदिर चिरेबंदी आहे. थोरले माधवराव पेशवे येथे येऊन गेले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*