नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम म्हणजे …सिंधुदुर्ग जिल्हा!
अथांग पसरलेला निळाभोर समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार गर्द वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आजही उभा आहे.
राजा शिवछत्रपती हे भारतातील पहिले व एकमेव सागरी उद्यान व आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचे सागरीय उद्यान मालवण परिसरात सिंधुदुर्गाच्या सभोवताली विकसित होत आहे.
सागरी किनार्यांसह पर्यटन, मत्स्योद्योग, काजू-आंबा या फळपिकांसह कृषी उद्योग, तसेच पवनउर्जा केंद्र आदी उद्योगांच्या व अन्य सुविधांच्या प्रगतीमुळे आज सिंधुदुर्ग जिल्हा केवळ कोकणातीलच नव्हे, तर राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा ठरतो आहे.महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्ह्याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्यास जातो.