सोलापूर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे इतर जिल्ह्यांप्रमाणेच व्यवहारात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी कन्नड, उर्दू,इंग्लिश आणि हिंदी बोलली जाते. स्थानिक बोली भाषा मराठी असो किंवा कन्नड, उर्दू तिला ‘सोलापुरी’ असे विशेषण लावले जाते. जसे सोलापुरी मराठी, सोलापुरी किंवा व्ह्गाड कन्नड, इत्यादी. सोलापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागलेली आहे, तसेच आंध्र प्रदेश हे राज्यही सोलापूर जिल्ह्याला जवळ असल्याने या जिल्ह्यात कन्नड आणि तेलगु भाषिक मोठ्या प्रमाणात राहतात. येथे लिंगायत, पद्मशाली व धनगर जातीचे लोकही मोठ्या प्रमाणावर आढळतात. या जिल्ह्यातील ज्वारीच्या भरघोस उत्पादनामुळे ज्वारीची गरम भाकरी येथे प्रसिद्ध आहे. तसेच येथील शेंगदाणा चटणी, इडली, डोसा, उत्तप्पा हे दाक्षिणात्य पदार्थ, तसेच डिसेंबर-जानेवारी महिन्यांतल्या हुरडा पार्ट्या प्रसिद्ध आहेत. चटणी-भाकरी व हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी अन्य जिल्ह्यांतूनही लोक येथे येतात.
Leave a Reply