ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ५०८.८५ चौ. कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात जिल्हा चंद्रपूर येथे ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे.
मुळच्या आदिवासी लोकांचा देव तारु आणि अंधारी नदी यामुळे या अभयारण्याला वरील नाव पडले. बांबू ( गवत ), साग, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ, अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असे हे जंगल आहे. १९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले गेले. ताडोबा हे ‘Land of the Tiger’ म्हणून ओळखले जाते.
ताडोबा अभयारण्यातील मोठ्या प्रमाणात वन्यजीव विविधता आढळते. या अभयारण्यात ४५ प्रकारचे सस्तन प्राणी ( Mammals ); २८० प्रकारचे पक्षी (Birds) ; ९४ प्रकारची फुलपाखरे (Butterflyes) ; २६ प्रकारचे कोळी (Spider) आणि ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptites) आढळतात.
Leave a Reply