आसाम
माचीस उद्योगाचे धुबुरीनगर
पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे. सन १९०५ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान म्हणून काझीरंगाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.