शहीद शिरीषकुमारांचे नंदुरबार

महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले  नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या हे शहर खानदेशात येते. […]

भुसावळ

भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात मध्य रेल्वेचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे.  येथे मध्य रेल्वेचे मोठे विद्युत निर्मिती केंद्र आहे. भुसावळची केळी सुप्रसिध्द असून अजठा लेणी इथून अवघ्या ६० किलोमिटरवर आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हे शहर तापी […]

बापू कुटीचे सेवाग्राम

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे. १९२१ साली या सेवाग्राम आश्रमाची स्थापना करण्यात आली. आश्रम स्थापन करण्यात जमनालाल बजाज, विनोबा भावे यांचा सहभाग होता. गांधीजींनी वास्तव्य […]

बालकवींचे जन्मगाव – धरणगाव

धरणगाव हे जळगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात माळी समाजाच्या लोकांची मोठी संख्या आहे. बालकवी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचे हे जन्मगाव. सुरतेच्या मोहिमेवर जाताना छत्रपती […]

श्री श्रीहरिहरेश्वर

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ आहे. येथील शिव मंदिर जगप्रसिध्द आहे. कोकणातील लोक विविध धार्मिक विधीसाठी श्री हरिहरेश्वरला महत्त्व देतात. निसर्ग सौदर्य व स्वच्छ सुंदर सागरी किनारा येथील दुसरे आकर्षण […]

महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर इचलकरंजी

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगामधील पूर्वेकडील मँचेस्टर म्हणून ओळखले आहे. सुमारे दीड लाख यंत्रमाग या शहरात आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २ लाख ८७ हजार इतकी आहे. कोल्हापुरातून रस्त्याने हे शहर २३ […]

नाणे परत करणारा हरिश्चंद्र गड

अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाटात हरिश्चंद्र गड किल्ला आहे. कलचुरी शासन काळात सहाव्या शतकात या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. पहाडांच्या अर्धवर्तुळाकार आकारामुळे गडावरुन खाली फेकलेले नाणे पुन्हा वरदेखील येते.

चवदार तळे

रायगड जिल्ह्यातील महाड हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श या शहराला झाला आहे. २० मार्च १९२७ रोजी बाबासाहेबांनी तवदार तळे अस्पश्यांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला आहे.

ऐतिहासिक शहर बीड

बीड हे मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर आहे. या शहरातून बिंदुसरा नदी वाहते. या नदीच्या पूर्व काठावर असलेले कंकालेश्वर मंदिर प्रेक्षणीय असून, मुर्तूजाशाह निजामाच्या काळात बांधलेली खजाना बावडीही प्रसिध्द आहे. हे बहुभाषिक सहर असून येथे मराठीव्यतिरिक्त उर्दू, […]

कृष्णाकाठचे वाई

वाई हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये ढोल्या गणपतीचे मंदिर बनविले. सिध्देश्वर मंदिरातील सिध्दनाथांची संजीवन समाधी, समर्थ रामदास यांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान […]

1 43 44 45 46 47